Breaking News

शेतकी सहकारी संघाची वाटचाल कौतुकास्पद : आ. थोरात


संगमनेर : राज्यातील शेतकर्‍यांना मदतीसाठी निर्माण झालेले शेतकी संघ सर्वत्र मोडकळीस आले आहेत. मात्र काटकसर, पारदर्शकता आणि स्वच्छ कारभार यामुळे संगमनेरच्या सर्व सहकारी संघाची मातृसंस्था ठरलेला शेतकी संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा असून या संघाची वाटचाल कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.
शहरातील गवंडीपुरा येथे नव्याने बांधलेल्या गोडावूनच्या लोकार्पण सोहळ्यााप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन संपतराव डोंगरे, सभापती अजय फटांगरे, निशा कोकणे, इंद्रजित थोरात, शंकरराव खेमनर, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, साहेबराव गडाख, खेमचंद निहलानी, मॅनेजर अनिल थोरात, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना आ. थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १९५९ मध्ये स्थापन केलेला हा शेतकी संघ सर्व सहकारी संस्थांची मातृसंस्था आहे. बाजारपेठेत सुरु केलेल्या छोट्याशा कार्यालयापासून सुरु झालेल्या या संघाची वाटचाल अभिमानास्पद आहे. पदाधिकारी व अधिकारी यांची उज्ज्वल परंपरा या संघाला लाभली. काटकसर आणि स्वच्छ प्रशासन त्यांनी केले आहे. शेतकर्‍यांना लागणारे खते, बियाणे, शेती औजारे, पाईप अगदी गुणवत्तेने पेट्रोल, डिझेल विक्री करुन या संघाने नावलौकिक मिळविला आहे. 

याप्रसंगी संचालक बाळासाहेब वाळके, तुळशीनाथ भोर, केशर सानप, सुनिल कडलग, रंगनाथ फापाळे, भाऊसाहेब खेमनर, विश्‍वनाथ शिंदे, आत्माराम हासे, बाबासाहेब जोंधळे, रामभाऊ कडलग, कमलेश नागरे, मच्छिंद्र होडगर, अर्जुन घुले, साहेबराव बारवे, राम तांबे, रविंद्र गायकवाड, पद्मा कार्ले, किशोर टोकसे, आर. बी. रहाणे, सुरेश थोरात, विष्णू राहटळ, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब मोरे, रामनाथ डोंगरे, अ‍ॅड. शंकरराव थोरात, सिताराम गुंजाळ, संतोष वर्पे, अण्णा थोरात, विलास कवडे, सुभाष गुंजाळ, शांताराम कढणे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. संघाचे मॅनेजर अनिल थोरात यांनी केले. शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. व्हाईस चेअरमन संपतराव डोंगरे यांनी आभार मानले.