Breaking News

काष्टी परिसरातील मृत बालकाची ओळख अस्पष्टच


श्रीगोंदा :तालुक्यातील काष्टी परिसरात एका उसाच्या शेतामध्ये काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनोळखी अंदाजे आठ ते दहा वर्षांच्या बालकाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला विलास मोहन दांगट यांनी दिली. 

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दांगट वस्ती पटाच्या परिसरात उसाच्या शेतात एक अनोळखी अंदाजे आठ ते दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून या बालकाचा मृतदेह ताब्यात घेवून पुढील तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले, तपासणी झाल्यानंतर बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हा बालक या परिसरातील आहे की, अन्य ठिकाणावरून मुतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आला याचा तपास सुरु आहे.