Breaking News

संभाजी राजांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन घडविले : डॉ. निमसे


प्रवरानगर : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे राज्य पुढे नेताना संभाजी महाराजांनीही सर्वस्व अर्पण केले. स्वराज्याचा अश्व त्यांनी पुढे नेला. अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा संभाजी राजांनी अगदी नेटाने पुढे चालवलाच. पण ‘बुद्धभूषण’सारखा संस्कृतग्रंथ आणि इतर ग्रंथ लिहून त्यांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन घडविले, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले. 
छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, सहशिक्षण अधिकारी प्रा. विजय आहेर, एच. आर. मॅनेजर भाऊसाहेब पानसरे, लेखा विभाग प्रमुख बापूसाहेब अनाप, स्थापत्य अभियंता भाऊ भवर, ईलेक्ट्रिक अभियंता शामराव गायकवाड, स्किल डेव्हलपमेंट विभागाचे समन्वयक प्रा. धनंजय आहेर, टिळेकर भाऊसाहेब, एकनाथ सरोदे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. शिवाजी निर्मळ यांनी प्रास्तविक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनीही संभाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती सांगितली. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध विभागाचे प्रमुख आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.