Breaking News

कर्जत-राशीन-सिद्धटेक रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांमधून रस्तादुरूस्तीची मागणी

कर्जत - राशीन - सिध्दटेक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना व भाविकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्तादुरूस्ती करण्याची मागणी कर्जत-राशीन येथील ग्रामस्थ व प्रवाशांमधुन पुढे येत आहे. 

अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे तिर्थक्षेत्र असल्याने सिध्दटेक येथे गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात.तसेच राशीन येथील प्रसिध्द व जागृत यमाई (जगदंबा माता) देवीचे मंदीर राशीन येथे असल्याने भाविकांची गर्दी कायम असते.त्यातच उन्हाळा असल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे.
दरम्यान कर्जत - राशीन - सिध्दटेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालवताना चालकांस मोठी कसरत करावी लागत आहे. दूरवरून आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सिध्दटेक, जलालपुर, भांबोरा, बारडगांव, राशीन, खेड, औटेवाडी, गणेशवाडी, आखोणी, करमनवाडी, वायसेवाडी, चिलवडी येथील ग्रामस्थांना शासकीय कामासाठी कर्जत शहरात यावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर जास्त वर्दळ असते, आणि रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहने खड्डे चुकविताना अनकदा अपघात होत आहेत.
आणि वयोवध्द नागरिकांना दुचाकीवरून जाताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत - राशीन - सिध्दटेक रस्त्यावर पडलेले खड्डे लवकारात लवकर बुजवण्याची मागणी भाविक, ग्रामस्थ व प्रवासी यांनी केली आहे.