Breaking News

विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

पुणे, दि. 11, मे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विधी समिती सभापतीपदी सत्ताधारी भाजपच्या माधुरी कुलकर्णी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा स मितीच्या सभापतीपदी सीमा चौघुले आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी संजय नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी कामकाज पाहिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांची 20 एप्रिलच्या महासभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील तौलनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरला नसल्याने सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली.