Breaking News

मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा विस्तार; नव्या २० मोटार बाईकचे लोकार्पण


मुंबई: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला.


सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या ‘शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवे’अंतर्गत २ ऑगस्ट २०१७ पासून मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत १० बाईक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या होत्या. आता या सेवेत आज आणखी वीस बाईक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. या बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर,नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत.