Breaking News

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मंडळांना बक्षिसे : तनपुरे


राहुरी विशेष प्रतिनिधी : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत ‘स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी, हरित राहुरी’ या उपक्रमात शहरात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी राहुरी नगरपालिकेने दि. १० जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत शहरातील सर्व गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ७१ हजार रुपयांचे प्रथम रोख बक्षीसासह अनेक बक्षिसे देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 
नगराध्यक्ष तनपुरे यांनी पालिका सभागृहात शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी सदर स्पर्धेविषयी पाणी माहिती दिली. या बैठकीला शहरातील २५ ते ३० गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अशोक आहेर, अक्षय तनपुरे, माजी नगरसेवक अँड राहुल शेटे, राजेंद्र उंडे, सुनील पवार, मछिंद्र गुलदगड, नयन शिंगी, मंदार धुमाळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब येवले, राजेंद्र उंडे, अँड. राहुल शेटे अशोक आहेर, सुनील पवार, वैभव ओस्तवाल, नयन शिंगी, सुनील शिंदे, रियाज शेख, अजित जाधव, गणेश कोहकडे, संजय कुलकर्णी, प्रसाद मैड, बाळासाहेब रासने, अय्यूब पठाण आदींनी मौलिक सूचना केल्या.