Breaking News

दखल - कर्नाटकातील घोडेबाजार

भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असताना जनतेनं त्यांना बहुमत दिलेलं नाही. कमी जागा मिळालेल्या पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा करणं म्हणजे घटनात्मक मूल्याची पायमल्ली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता वाटतं आहे. मात्र, गोवा, मेघालय व मणिपूरमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला सत्ता स्थापण्याची संधी द्यावी, असं त्यांना आणि त्यांच्या पक्षालाही वाटलं नाही. तिथं घोडेबाजार भरवून, आमदारांना आमिष दाखवून भाजपनं सत्ता मिळविली. 


आता मात्र कर्नाटकमध्ये 104 जागा मिळविलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी अगोदर बोलवलं जावं या संकेताची भाजपला आठवण झाली. त्यासाठी राज्यपालपदाचा दुरुपयोग के ला जात आहे. वजूभाई हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना एच. डी. देवेगौडा पंतप्रधान होते. भाजपत त्या वेळी बंडखोरी झाली होती. तिचा फायदा घेऊन राज्यपालांनी सरक ार बरखास्तीचा अहवाल पाठविला होता. त्या वेळी देवेगौडा यांनी सरकार बरखास्त केलं होतं. आता त्याच वजूभाईंपुढं देवेगौडा यांच्या मुलानं आमदारांची यादी देऊन सरकार स्थापनेचा दावा केला असला, तरी आता वजूभाई मोदी यांच्या प्रेमाला जागण्याचीच शक्यता जास्त दिसते. त्याचं कारण मोदी यांनी वजूभाईंना जास्त काळ अर्थमंत्रिपद, विधानसभेचे अध्यक्षपद दिलं होतं. सरकार बरखास्त करण्याचा राग काढायचा, की घटनात्मक संदिग्धतेचा फायदा घेऊन निर्णय घ्यायचा हे आता वजूभाई ठरवतील. भाजपच्या वि धिमंडळ पक्षनेतेपदी अपेक्षेप्रमाणं बी.एस. येदियुरप्पा यांची निवड झाली असून त्यांनी लगेच उद्याच शपथविधीची तयारी चालविली आहे. काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या काही आमदारांना अनुपस्थित ठेवून येदियुरप्पा साधं बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र, भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. येदियुरप्पा यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवडदेखील करण्यात आली आहे. त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. सत्ता स्थापनेसाठी भाजप, काँग्रेस आणि
धर्मनिरपेक्ष जनता दलाची मोर्चेबांधणी सुरू आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे व काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजाकडून करण्यात आला आहे. बेंगळुरूमध्ये काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल व भाजप आपल्या आमदारांसोबत बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसमधील लिंगायत समाजाच्या आमदारांनी वोक्कलिंग समाजाच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी स्वीकारण्यास विरोध केला असल्याचं सांगण्यात येतं. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या बैठकीला त्या पक्षाचे दोन आमदार गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या चार आमदारांनीही बैठकीला दांडी मारली. भाजपनं भरविलेला घोडेबाजार आणि त्याला बळी पडणार्‍या आमदारांची मानसिकता लक्षात घेऊन काँग्रेसनं इग्लटन रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांसाठी रुम बुक केल्या आहेत. काँग्रेसनं आपल्या आमदारांना विशेष विमानानं बेंगळुरुला आणण्याची तयारी केली आहे. येदियुरप्पा, तसेच कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपचे 104 जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे 78 व जनता दलाचे 37 व बसपाचा एक निवडून आला असून, त्यांची बेरीज 116 होते. सत्तेसाठी सध्या 112 आमदारांची गरज आहे. भाजपकडे 7 आमदार कमी असून, ते मिळविण्यासाठी जनता दल व काँग्रेस यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं काँग्रेसनं आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर राज्यघटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणते पर्याय तपासावेत, याची शिफारस सरकारी आयोगाने केली होती. क र्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे त्यानुसार चार पर्याय उपलब्ध आहेत. सर्वाधिक जागा मिळविणारा वा निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पक्षांना पाचारण करणे.
कर्नाटकात काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दलानं निवडणूकपूर्व आघाडी न केल्यानं हा पर्याय त्यांना उपलब्ध नाही. या पर्यायाचा विचार केला, तर भाजपला प्रथम बोलविलं जाईल. अपक्षांसह इतरांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापनेचा दावा सर्वाधिक जागा जिकणार्‍या पक्षानं केल्यास त्यांना निमंत्रण देणं हा दुसरा पर्याय असतो. या पर्यायाचा फायदाही भाजपला फायदा होईल. निवडणुकीनंतर आघाडी केलेले सर्व पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांना संधी देणे. या दोन्ही पर्यायांत भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरला, तर निवडणुकीनंतर एकत्र आलेल्या काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करण्याचा पर्याय राज्यपालांपुढं आहे. निवडणुकीनंतर आघाडी के लेल्या पक्षांपैकी काही सरकारमध्ये राहून व काही बाहेरून पाठिंबा देणार असतील, तर त्यांना बोलावणं हा अखेरचा पर्याय असतो. या पर्यायात काँग्रेस-धर्मनिरपेक्षा जनता दलाला संधी मिळेल. सर्वांत मोठया पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावं, असा संकेत आता भाजप पुढं करीत असला, तरी यापूर्वी त्यानं ती संधी काँग्रेसला मिळू दिली नव्हती. पूर्वी का ँग्रेसनं फोडाफोड करून सत्ता मिळविली असं आता भाजप सांगायला सुरुवात करील. परंतु, काँग्रेसनं यापूर्वी घटनात्मक मूल्यं पायदळी तुडविली, म्हणून तर भाजपला सत्ता देण्यात आली. इतरांपेक्षा वेगळा असलेला पक्ष अशी शेखी मिरवणारा भाजपही त्याच मार्गानं जाणार असेल, तर मग काँग्रेस व भाजपमध्ये फरक काय उरला, असा प्रश्‍न उपस्थित होतो.