Breaking News

​संत सावता माळी युवक संघातर्फे कपाळे​ यांचा सत्कार


राहुरी : येथील शिवाजी कपाळे यांना ​अादर्श सहकार अर्थरत्न २०१८ पुरस्कार​ मिळाल्याबद्दल त्यांचा संत सावता माळी युवक संघाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात अाला. यावेळी कपाळे यांचे सहकारी डाॅ. विलासराव व मॅनेजर सचिनराव खडके उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे २०१८ चा दिला जाणारा पुरस्कार साई अादर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे यांना मिळाल्याबद्दलत्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भा. ज. पा. चे शहर उपाध्यक्ष सचिन मेहेत्रे, संत सावता माळी युवक संघाचे राहुरी शहराध्यक्ष रोहित टेंभे, तालुकाध्यक्ष अशोक तुपे, जगन्नाथ सुर्यवंशी, दिपक गुलदगड, गौरव रहाणे, राम कोह्राळे, प्रविण सरोदे, किशोर धाडगे, वैभव पंडीत, प्रणय बोरकर, पटारे आदींसह कपाळेंचा आदी मित्र परिवार उपस्थित होता.