Breaking News

सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न अपयशी

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात साेमवारी जागरूक पाेलिस कर्मचाऱ्याने एका चेहरा झाकलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्याचा बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी त्या बंदूकधाऱ्याने गाेळीबारही केला; परंतु त्याचा हेतू अपयशी ठरला. हा प्रकार पुलवामाच्या सादेपाेरा भागात घडला. त्याच्या प्रत्युत्तरात संबंधित पाेलिस कर्मचाऱ्याने गाेळीबार केल्याने ताे बंदूकधारी पळून गेला. या घटनेत कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नाही, असे सैन्याच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.