Breaking News

अखेर येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा !


येडियुरप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बहुमत चाचणीच्या आधीच येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी येडियुरप्पा यांनी भावनिक भाषण केलं. यावेळी येड़ियुरप्पा यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत, आम्ही नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आलो. सिद्धरामैय्या यांच्या अपयशामुळे आम्हाला यश मिळालं, असं येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा आपल्या भाषणात अतिशय भावूक आहेत. आम्ही कमी आकड्यावरून कसे वाढत गेलो, असंही येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं.