Breaking News

गोठ्याला आग लागून सुमारे तीस बकर्‍या जळून खाक


अकोला - आकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपरी खुर्द या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात आज रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत 30 बकर्‍या ज्यामध्ये बोकड ,बकर्‍या व काही लहान पिलां सह जळुन खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी पिंपरी खुर्द गावात गणेश रामदास टेकाम यांच्या गावाबाहेरील शाळेच्या बाजूला असलेल्या बकर्‍यांच्या गोठ्याला 3 वाजता आग लागली असून या आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकर्‍या,बोकड व काही लहान पिले जागीच जळून खाक झाली आहेत. 

सदरहू आगीची माहिती गावकरी व गणेश टेकाम यांना माहीत होताच ते घटनास्थळी धावतच आले परंतु तोपर्यंत रौद्ररूप धारण केलेल्या आगीने 30 बकर्‍यांचा पार क ोळसा झाला होता.आकोट नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने माहिती मिळताच वेळेवर पोहोचून आग विझविली परंतु बकर्‍या मात्र वाचविता आल्या नाहीत.त्याच ठिकाणी काही अंदाजे 15 लहान पिले न बांधता ठेवली होती तेव्हढीच फक्त आपला जीव वाचवून पळाल्या मुळे वाचली आहेत. सदरहू गणेश रामदास टेकाम हे गरीब शेतमजूर असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच बक रिपालनाचा व्यवसाय सुरू केला होता.या आगीमुळे त्यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे गावकरी सांगत आहेत.

नेमके किती नुकसान झाले याची माहिती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा केल्यावरच मिळेल.
आगीत झालेल्या नुकसाणीबद्दल गावकर्‍यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या घटनेची हिवरखेड पोलिसांकडून माहिती घेण्यासाठी मोबाईल वर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.