Breaking News

तेजस सिनगरची शिक्षणासाठी फ्रांसला निवड


कोपरगाव : तालुक्यातील भोजडे येथील तेजस परसराम सिनगर याची फ्रांस येथे शिक्षणासाठी नुकतीच निवड झाली आहे.
तेजसची नेस्ट परिक्षेद्वारे निवड झाली आहे. देशभरातून फक्त १३५ जणांचीच यात निवड झाली आहे. त्यात तेजसचा १८ वा क्रमांक आला. तेजस हा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव परशराम सिनगर यांचा मुलगा आहे. फ्रांस येथे शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आ. स्नेहलता कोल्हे, ‘संजीवनी’चे अध्यक्ष बिपिन कोल्हे, काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदींनी कौतूक केले.