Breaking News

दुहेरी हत्याकांड खटल्याप्रकरणी अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करा मोर्चा दरम्यान नातेवाईकांकडून मागणी

भरदिवसा गोळ्या घालून दोघांना ठार मारले आहे. घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. यामुळे आरोपी आपली आर्थिक ताकद वापरुन पळवाटा काढू शकतो. यासाठी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मोर्चा दरम्यान नातेवाईक व नागरीकांनी केली आहे.
दुहेरी हत्याकांडात मुत्यू पावलेल्या योगेश राळेभात व राकेश राळेभात यांचा काल 7 मे रोजी दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नातेवाईकांनी व सकल मराठासह शहरातील नागरिकांनी त्या ठिकाणाहुन मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, माजी जि.प. सदस्य मधुकर राळेभात, बबन काशिद, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, विकास राळेभात, विजयसिंह गोलेकर मंगेश आजबे, गुलाब जांभळे, सुरेश भोसले, नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, सुनील जगताप, कैलास हजारे, प्रा. लक्ष्मण ढेपे, गणेश हगवणे, अवधूत पवार, शरद कार्ले, तर महीलांमध्ये निर्मला राळेभात, प्रिती राळेभात, नगरसेविका कमल राळेभात, रूपाली राळेभात, चंद्रकला राळेभात, सुनीता राळेभात, पद्मा वारे, रूपाली काकडे, वंदना राळेभात, उषा राळेभात, वैशाली राळेभात, लता राळेभात, योगीता राळेभात यांचेसह आदी उपस्थित होते. 

मोर्चा दरम्यान नातेवाईक व नागरीकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, जामखेड येथील गावठी कट्टे व शस्त्रास्त्रांचा जामखेड तालुका आगार बनला आहे.तालुक्यात गुन्हेगारांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. ही सर्व पाळंमुळं खणून काढणे आवश्यक आहे. या हत्याकांडाचा तपास जलदगतीने व्हायला हवा. त्यासाठी कार्यक्षम आयपीएस अधिकार्‍याची तपास कामी नेमणूक व्हायला हवी. शिवाय तालुक्यातील दहशत, गुंडागर्दी, अवैध धंदे मोडून काढण्यासाठी या हत्याकांडाची व येथील दहशतीच्या कृत्यांची स्वतंत्रपणे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआटी नेमूण चौकशी व्हायला पाहिजे. 
ज्या तालमीच्या नावाखाली गुंड तयार केले जातात, ती तालीम जमिनदोस्त करण्यात यावी, तसेच ही तालीम अतिक्रमण करून तयार केली आहे. पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. दुहेरी हत्याकांड प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. या पुर्वीही घटनेतील आरोपींनी तालुक्यातील तेलंगशी व वाकी या ठिकाणी दहशद निर्माण करण्यासाठी गावठी कट्टे वापरले होते. तालुक्यात प्रभारी राज आहे. हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचे प्रस्ताव कोण रद्द करत याला पालकमंत्री जबाबदार आहेत. तसेच स्थानिक पोलीसांवर विश्‍वास नसल्याने या तपासासाठी आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.