Breaking News

अभिमन्यू काशिद यांचे सुयश


संगमनेर : तालुक्यातील वडगावपान येथील अभिमन्यू काशिद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या 'कृषीसेवा' परीक्षेत मंड़ल कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुन काशिद यांचा अभिमन्यू हा मुलगा आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेला ७९ जागांसाठी संपूर्ण राज्यातून १५ हजार विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात अभिमन्यू काशिद याने महाराष्ट्रात खुल्या गटातून ६ वा क्रमांक पटकावला. काशिदच्या प्रशासकीय निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.