Breaking News

नोटा दाखविर्‍यांना नोटाचा रस्ता दाखवा, युवकांची पोस्टरद्वारे जणजागग्रुती


सुपा / प्रतिनिधी । पारनेर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका सुरू असताना तालुक्यातील जनता योग्य उमेदवार नसल्याकारणाने व पैशातुन सत्ता व सत्तेतुन पैसा अशी मानसिकताच निर्माण झाल्यामुळे समाजाचा विकासात्मक व सामाजिक सलोखा यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा विचार समोर ठेवुन शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, अपमान पचवायची ताकद व जीवनात काहिसा त्याग या गुणांनी पुर्ण अशा समाज व राष्ट्राचे हीत समोर ठेवुन समाजासाठी निस्वार्थ समाजाची सेवा करणार्‍या नेतृत्वाच्याच पाठीशी समाजाने उभे राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केले.
जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार, भ्रष्टाचारी, गुंड, लुटारु, व्यसनी, व्याभिचारी लोकांना ग्रामपंचायतसारख्या पवित्र मंदीरात जावू देवु नका. निवडणुकीमध्ये चारित्र्यशिल उमेदवार दिसत नसेल तर मतदाराने नापसंतीचे (नोटा) बटन दाबुन आपले मत व्यक्त करा, आपला मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थित बजावणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे, अशा प्रकारे संपुर्ण तालुक्यात लोकशाहीला बळकट करण्यासाठी नोटा दाखवणार्‍यांना नोटाचा रस्ता दाखवुन गावोगावी मतदार जनजागृती अभियान करुन प्रेरणादायी उपक्रमाचा प्रारंभ यावर्षापासुन पारनेर तालुका आदर्श तालुका निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, भाऊसाहेब खेडेकर, सचिन शेळके, बाळासाहेब शेरकर यांसह तालुक्यातील ग्रामस्थांनी गतवर्षी सुरू केला आहे. या अभियानाचे पोस्टर तालुक्यातील वाडेगव्हाण, मावळेवाडी, यादववाडी, कान्हुरपठार, काकणेवाडी या गावांतील निवडणूक सूरू असुन त्या गावांतील भिंतीवर लावुन मतदारांच्या भेटी घेवुन मतदानाचे महत्व गावोगावी सांगण्यात येत आहे. गावोगावी ग्रामस्थांकडुन चाललेल्या अभियानाचे स्वागत होत आहे. नक्की मतदार नोटा बटनाचा निवडणुकीत उपयोग करुन लोकशाहीला बळकट करण्याच्या महायज्ञात सहभागी होतील व तालुक्यातुन मोठी चळवळ उभी राहील असे खेडेकर व पवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणुकीमध्ये खोटी आश्‍वासने देवुन अनेकजन निवडून येतात, मात्र निवडून आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र गावाच्या विकासाला व सामाजिक सलोख्याला हरणाच्या शेंडिला बांधतात, म्हणुन अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठच फिरवली आहे, त्यामुळे या निष्क्रीय नेत्यांचं फोपावत चाललं आहे. त्यामुळे या मतदार जनजागृती अभियानाचा लोकशाही बळकट करण्यासाठी मोठा फायदा होणार व इधर का डोंगर उधर करेंगे, उधर का डोंगर इधर अशा कृतीशुन्य भ्रष्ट नेत्यांना फटका बसणार आहे.