Breaking News

डॉ.विखेंच्या दौर्‍याकडे लागले राजकीय धुरिणांचे लक्ष !


पाथर्डी /विशेष प्रतिनिधी : 13 मे रोजी पाथर्डी तालुक्यातील श्री भगवान विद्यालय खरवंडी कासार येथे, जनसेवा फौंडेशन व डॉ. विखे पा.फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन डॉ.सुजय विखे यांच्या शुभहस्ते होणार असल्याने, ते या निमित्ताने काय भाष्य करतील याकडे नगर दक्षिणेतील तमाम राजकीय धु रिणांचे लक्ष लागले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात कोरडगांव येथे अशाच शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विखेंनी राजकीय भाष्य करण्याचे कटाक्षाने टाळले होते. परंतु नगर दक्षिण मतदारसंघात उत्तरोत्तर आयोजित केलेल्या शिबीरांत डॉ. विखेंनी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच केल्याने त्यांच्या काही विधानांवर विनाकारण आक्षेप घेण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा हा कार्यक्रम होणार असल्याने ते राजकीय विषयाला स्पर्श करतील यात शंका नाही. त्यामुळेच या क ार्यक्रमाकडे नगर दक्षिणेचे कान टवकारणे स्वाभाविक आहे.

 जिल्हा विभाजनाच्या प्रश्‍नावर संभाव्य स्वयंघोषीत इच्छूकांनी उडविलेली राळ, जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे ताजे वक्तव्य आणि समर्थक कार्यकर्त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे अडगळीला पडलेले पालकमंत्री या सार्‍या घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर काही बोलणार नाहीत, तर ते विखे कसले..? जिल्हा विभाजनाला विरोध केला नसल्याचे वारंवार स्पष्टीकरण देऊनही काही उतावळ्या इच्छूकांनी या विषयाचे भांडवल करीत चर्चेच्या केंद्रस्थानी यायचा प्रयत्न केला. परंतु या विषयाला ऐनवेळी उकरुन काढणारे पालकमंत्रीच अडचणीत आल्याने हा विषय मुद्द्यात परावर्तित होऊ शकला नाही. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने विखेंवर आरोप करणार्‍यांच्या तोंडाच्या वाफांचे आपोआप बाष्पीभवन झाल्याने त्यांनाही दुसरा मुद्दा उरला नाही. 2014 च्या लोकसभेपुर्वी दिवंगत जेष्ठ लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी क रण्यासाठी नगर दक्षिणेचा दौरा केला होता. त्यावेळी आपण लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी हा खटाटोप करत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला होता. तरीही त्यांच्या दौर्‍यामुळे राजकीय धुरळा उडाला होता. या मतदारसंघातील समस्यांशी या कुटुंबाची सातत्याने नाळ जुळली असल्याचे वास्तव्य असूनही त्यांच्या सामाजिक असो वा अजुन कुठल्याही कार्याला, राजकारण चिकटतेच! डा ॅ.सुजय विखेही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. त्यातच त्यांनी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायचे जाहीर केल्यामुळे ते राजकीय प्रवादांना अपवाद राहूच शकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या 13 मे च्या कार्यक्रमाचे, ’मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर’ हे औचित्य असले तरी त्यांच्या या कार्यक्रमाकडे तमाम राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेले असेल.