Breaking News

भाजपचे राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी मारली


पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झालाभाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत 29 हजार 572 मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला.

राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे 2 लाख 43 हजार 210 मतं मिळाली.

बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनीही 2 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किरण गहला यांना जवळपास 71 हजार मतं मिळाली.