Breaking News

गगाजी चावडा यांना आर्थिक मदत प्रदान

कोपरगाव शहर प्रतिनिधी : येथील गगाजी काना चावडा यांना कर्करोगाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली. यावेळी बोलतांना आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांपुढे या उपचारासाठी वैद्यकीय मदत उभी करण्याचे मोठे आव्हान असते. त्याबाबत मार्गदर्शन करून निधी उपलब्ध करून देऊन संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समुहाच्या माध्यमांतून मोफत नेत्रतपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करून आजवर १० हजार रुग्णांची नेत्रतपासणी केली आहे. संजीवनी मदत केंद्राअंतर्गत कोपरगांव विधानसभा मतदार संघातील तसेच परिसरातील विविध दुर्धर कर्करोग, मेंदूविकार, हृदयविकार आणि मूत्रपिंड या आजाराने ग्रस्त असल्येल्या शेकडों रुग्णांना शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष व इफकोचे विश्वस्त विवेक कोल्हे यांनीदेखील वैद्यकीय मदत दिली आहे.