Breaking News

भाजपच्या वारकरी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी हभप अमृत डूचे

भाजपच्या वारकरी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी खुरदैठण येथील ह.भ.प. अमृत महाराज डूचे यांची निवड करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांनी नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. 

जामखेड तालुक्यातील खुरदैठण येथील ह.भ.प. अमृत डूचे हे गेल्या 15 वर्षापासून काम करतात. त्यांनी अनेक वर्ष वारकरी संप्रदायाचे उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेवून, त्यांना जामखेड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डूचे महाराज यांच्या या निवडीबद्दल पंचायत समितीत तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जि. प. सदस्य अनिल लोखंडे, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, कल्याण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.