Breaking News

पहिला पत्रकार आमदार देण्यासाठी मुख्यमंत्रांना साकडे : कोळेकर


श्रीरामपूर : 
पदवीधर मतदारसंघाप्रमाणेच पत्रकार मतदार संघ स्थापन करून त्यातून राज्यातला पहिला पत्रकार आमदार निवडून देण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असून त्यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आहे. तसेच पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या जुलै महिन्यात पत्रकारांची पहिली पतसंस्था स्थापन केली जाणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी व्यक्त केला. 

श्रीरामपूर येथील अशोकनगर फाटा परिसरातील लक्ष्मी अग्रो टुरिझम हाँलिडे होम्स येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पत्रकारांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी, राज्य प्रमुख संघटक बाबासाहेब राशिनकर, राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव, उतर महाराष्ट्राचे अध्यक्ष देविदास बैरागी, प्रांतिक सदस्य सुनिल कुमावत, उत्तर महाराष्ट्रचे उपाध्यक्ष रामनाथ ज-हाड, डी. बी. काद्री, अशोक दुशिंग, निलेश वाघ, निलेश पर्बत आदींनी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रारंभी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी प्रास्तविक केले. 

यावेळी महाराष्टा पत्रकारसंघाच्यावतीने जिल्हास्तरिय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना आदर्श पोलिस अधिकारी, दैनिक लोकमंथनचे उपसंपादक बाळासाहेब शेटे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार, शिवाजी कपाळे यांना आदर्श सहकार क्षेत्र, दतात्रय घोलप यांना समाजसेवक, बालकिर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज पवार, गणेश, डॉ. सुनिल साळवे आदींचा समावेश आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेंद्र बनकर, जिल्हा संपर्क प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे, उपाध्यक्ष अमोल राखपसरे, दिलीप लोखंडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साईनाथ बनकर, राहाताचे अरुण बाबर, राहुरी तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवे, भारत म्हसे उपाध्यक्ष अमोल राखपसरे, दिलीप लोखंडे, जिल्हा संघटक राजेंद्र दुनबळे, अमोल बोर्डे, लक्ष्मण साठे, कवी बाबासाहेब पवार, आंनदा साळवे, अरुण बाबर, गणेश भालेराव, अविनाश डोखे, हेमंत शेजवळ, जालिंदर रोडे, प्रकाश चिखले भारत म्हसे आदींनी पुढाकार घेतला. प्रारंभी राजेंद्र बनकर प्रास्तविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र उंडे यांनी केले. रामनाथ जहाड यांनी आभार मानले. 

… तर जनहित याचिकेसाठी पुढाकार घ्या : शेटे 
या कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना पुरस्कारार्थी असलेले ‘दैनिक लोकमंथन’चे उपसंपादक बाळासाहेब शेटे म्हणाले, आतापर्यंत राज्याची सत्ता भोगत असलेल्या सत्ताधीश मंडळींनी पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्याचे केवळ आश्वासन देऊनच झुलवत ठेवले. त्यामुळे यापुढे अर्ज, विनंत्या, निवेदने असे न करता महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने या सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. पत्रकार हा स्वाभिमानी, निडर आणि निर्भिड, निःपक्षपाती नुसते कागदावरच न राहता प्रत्यक्ष त्याची तशीच कृती असावी, अशी अपेक्षाही शेटे यांनी व्यक्त केली.