Breaking News

थोरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड


संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयामध्ये व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि प्लेसमेंट सेलअंतर्गत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे व संगमनेर येथील सात कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यामध्ये महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी दिली. 

यावेळी सचिव चंद्रकांत कडलग, संस्थेचे रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, डॉ. आर. के. दातीर, शिवाजीराव नवले आणि कंपन्यांचे एच. आर उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सचिव चंद्रकांत कडलग, रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, प्राचार्य डॉ. आर. के. दातीर आदींनी अभिनंदन केले.