Breaking News

‘विखे पाटील’च्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी


प्रवरानगर : येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या परिसर मुलाखतीमध्ये ९६ विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकरीची संधी मिळाली. एप्रिल आणि मे महिन्यात १२ नामांकित कपन्यांनी लोणी येथे परिसर मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती प्राचार्य मनोज परजने यांनी दिली.
विखे पाटील पॉलिटेक्निक येथे एप्रिल व मे या दोन महिन्यांत रिंडर इंडिया प्रा. लि., पुणे, लुपिन फार्मासुटीकल्स तारापूर, व्हरॅक इंजिनिअरींग लि. चाकण, एम. टेक. ईनोव्हेशन पुणे, धूत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, जय हिंद आकुर्डी पुणे, स्पॅको टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चिंचवड या कंपन्यांमधून विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड झाली आहे. एक महिन्याचे कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले असल्याने मला याचा मोठा फायदा झाला असल्याचे पुजा संपतराव कोळसे या विद्यार्थिनीने सांगितले.