Breaking News

प्रवरासंगमच्या ग्रामसभेत विविध ठराव


प्रवरासंगम - येथील ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठराव मांडण्यात आले. सदर ग्रामसभेमध्ये शासनाने जाहीर केलेले विषयाचे वाचन करण्यात आले . 

यावेळी तहसीलदारांनी दिलेल्या पत्रानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,अंतोदय योजना लाभार्थी ची नावे , ग्रामसभेद्यावारे ठराव करून पात्र , अपात्र लाभार्थी निवडने , मराठा आरक्षणाचा ठराव , भुमीहिन शेतमजूर विधवा परीतक्ता , ग्रामपंचायतने आँनलाईन केलेली ड यादी नुसार घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा ठराव मांडला गेला होता सदर ठराव मंजूर करण्यात आला, शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफीस मतदार यादी वाचन , पंतप्रधान स्वस्थ मिशनमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थींची यादी जाहीर , संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान 1 मे पासून सुरू करण्यात येणार या विषयावर चर्चा करण्यात आली . ध्वजारोहनास अनेक प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य संजय नजन, पाडुंरग काळे, चेअरमन संदिप सुडके. अनिल आगळे. अरूण माळी, नितीन भालेराव , सुनील बाकलीवाल, ग्रामविकास अधिकारी शेळके, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रवरासंगम पोलीस स्टेशन चे कर्मचारी , कामगार तलाठी म्हसे, कोतवाल निवृत्ती माळी, स्वस्त धान्य दुकनदार कैलास शिंदे, सोमनाथ साठे ,विद्युत मंडळाचे ऊपळकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.