Breaking News

काश्मीरमध्ये एक ठार तर एक जवान शहीद

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सैन्याच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात एक नागरिक ठार झाला असून एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांनी सैन्याच्या 50 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांवर काकपोर परिसरात हल्ला केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत एक जवान व एक नागरिक जखमी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधिक मृत नागरिकाचे नाव बिलाल अहमद गनई असून, तो टॅक्सीचा व्यवसाय करत होता. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, शोपियामध्ये आयईडी स्फोटात 3 जवान जखमी झाले आहेत. शोपियामधल्या सुगन आणि चिल्लीपोरा भागात हा स्फोट झाला. त्यानंतर या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.