Breaking News

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी १८ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या ६ महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या दि. १८ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या ६ महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. २०१८-१९ या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०१८ या ६ महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी ४५० रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा १०० रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.