Breaking News

राज्यस्तरीय बालसुसंस्कार शिबिराचे अकोल्यात बुधवार पासून आयोजन

अगस्ती देवस्थान ट्रस्ट व वारकरी संघटना अकोले यांच्या सहकार्याने व अगस्ती ऋषी गुरुकुल, आळंदी यांच्या विद्यमाने अकोल्यात बुधवार 2 मे पासून पर्यत राज्य स्तरावरील बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 मेपर्यंत चालणार आहे अशी माहितीअगस्ती ऋषी गुरुकुल, आळंदीचे हभप किशोर महाराज धुमाळ व अगस्ती देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना अगस्ती ऋषी गुरुकुल, आळंदी येथील हभप किशोर महाराज धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजच्या गतिमान युगात विज्ञानाला आध्यात्मिक मुल्यांची जोड देऊन बाल मनातील आत्मअविष्कार संस्कृतीचे संस्कार करणे ही शिक्षणाची खरी गरज आहे. जीवनाला संस्काराची जोड असल्यास सर्वांगसुंदर व्यक्तीमहत्व घडते. संत विचारातून नित्य सुसंस्कार प्रगट होतं असतात आणि विचारांचा सुगंध बाल मनामनात फुलविण्यासाठी या बाल वारकरी प्रशिक्षण सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अकोले येथील अगस्ती देवस्थान आश्रमात हे बालसुसंस्कार शिबिर एकूण 13 दिवसांचे ठेवण्यात आले आहे. या शिबीरातील दैनंदिन प्रशिक्षण, दररोजचे हरिपाठ, भजन, किर्तन तसेच पखवाज (मृदंग) वादनाचे प्राथमिक शिक्षण, हरिपाठ पाठांतर, संगित वारकरी भजनाची पुर्वतयारी, श्रीमद्भगवतगीता 9, 12 व 15 व्या अध्यायाची संहिता, सकल संत जीवन चरित्रावर प्रवचन, आध्यात्मिक जीवन मुल्यांची शिकवण दिली जाणार आहे. याशिवाय सामाजिक मुद्यांवर आधारित व्यक्तीमत्व विकासासाठी व्याख्यानमाला, वृक्षारोपण मार्गदर्शन, व्यायाम व योगासन यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय बाल वारकरी सुसंस्कार शिबीरात महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी सहभाग घ्येण्यासाठी संपर्क हभप राजेद्र महाराज नवले (९९२१०४९९०६), हभप संदिप महाराज सावंत (९९२२६८२००१), हभप किशोर महाराज धुमाळ (९९२१३०८३९५), कैलास महाराज आहेर (८४५९२३१८६५) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन अगस्ती देवस्थान ट्रस्ट व अगस्ती ऋषी गुरुकुल आळंदीचे संयोजक संचालक व बालसुसंस्कार शिबिराचे आयोजक हभप किशोर महाराज धुमाळ यांनी केले आहे.