Breaking News

आजाराला कंटाळून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केली. स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरे गोळी झाडून त्यांनी आपलं जीवन संपवलं.गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे


दुपारी 1.40 च्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांच्या गाडीचा चालक त्यांच्या रूममध्ये गेले त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. चालकाने त्यांना लगेच कारनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी अनेक महत्त्वाच्या हय प्रोफाईल प्रकरण सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. गेल्या सहा महिन्यांपासून ते रजेवर होते. उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती.