Breaking News

श्री संत गजानन महाराज सेवा समिती तर्फे ५१ हजार भक्तांचे एक दिवसीय महापारायण


नगर- आपल्या अहमदनगर शहरामध्ये श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे (श्री गजानन महाराज चरित्रांचे) ५१ हजार भक्तांचे एक दिवसीय महापारायण दिनांक १६ डिसेंबर २०१८ रोजी करण्याचे निश्चित करणेत आलेले आहे. अहमदनगर मधील तसेच महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या महाराजांच्या भक्त परिवारासाठी खरोखर हि भाग्याची गोष्ट आहे.

सदर महापारायणामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरु करणेत आलेली आहे. सदर महापारायण यशस्वी करण्यासाठी विविध ११ समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून यामध्ये ज्या भक्तांना सेवा करण्याची इच्छा आहे किंवा पारायणमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे अशा सर्व भक्तांनी खालील भ्रमणध्वनी वर संपर्क करावा अशी माहिती महापारायण समिती दिलेली आहे.