Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 13, जून - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांनी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीही यापूर्वी अर्ज केला नाही, अशा अर्ज क रण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.
अष्टेकर म्हणाले, या योजनेची मर्यादा वाढवून 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यंत उचल केलेल्या व 30 जून 2016 रोजी थकीत असलेले शेतकरी देखील अर्ज करण्यास पात्र करण्यात आलेले आहेत. तसेच इमुपालन, शेडनेट, पॉलीहाऊससाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेले शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.