Breaking News

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याची महत्वाकांक्षा - मुख्यमंत्री

वॉशिंग्टन - महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2025 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर करण्याची महत्वाकांक्षा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेत केले. महाराष्ट्र सरकार पायाभूत सुविधा, शेती आणि सेवांसह विविध क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा लाभ घेत हे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस हे जॉर्जटाउन विद्यापीठ इंडिया इनिशिएटिव्ह आणि स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज (सीएसआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका क ार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 400 अब्ज डॉलर्स आहे. सध्याचा विकास दर पाहता 2030 पर्यंत महाराष्ट्र सन 2030 पर्यंत ट्रिलियन-डॉलरची अर्थव्यवस्था होईल. पण आम्हाला हे ध्येय पाच वर्षांपूर्वीच साध्य करायचे आहे. आम्हाला यात यश मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारने मागील 4 वर्षांत केलेल्या विकासकामांचे सादरीकरण ही केले. यामध्ये दुष्क ाळमुक्त राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांसह, पायाभूत क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकींचाही समावेश होता.