Breaking News

पंतप्रधान 20 जूनला साधणार शेतकर्‍यांशी संवाद


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते शेतकर्‍यांशी विविध मुद्यांवर संवाद साधणार आहेत. ही चर्चा विकास आ णि कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या मुद्द्यांवर असणार आहे. पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी चर्चा करताना ही माहिती दिली. सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील लाभार्थ्यांसोबत मोदी चर्चा करत असतात. याचाच एक भाग म्हणून मोदींनी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत घरगुती गॅसचा लाभ मिळालेल्या महिलांसोबतही संवाद साधला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत चार कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन मिळाले आहे. पंतप्रधानांनी यापूर्वी स्वास्थ्य योजना आणि स्टार्टअप योजनांतील लाभार्थ्यांसोबतही चर्चा केली आहे.