Breaking News

पश्‍चिम महाराष्ट्रासाठी 29 हजार 182 क्विंटल बियाणे विक्रीचे उद्दिष्ट


पुणे - चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात मिळून एकूण 43 हजार 682 क्विंटल इतके बियाणे उपलब्ध क रुन देण्यात येत आहे. बाजरी बियाणांच्या भावात किलोमागे 18 ते 20 रुपयांनी वाढ झाली असून, भात वाणांचे भाव स्थिर आहेत. मात्र, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी आणि मका बियाणांच्या किंमतीत गतवर्षीपेक्षा घट झाल्याची माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी दिली.पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांसाठी मिळून 29 हजार 182 क्विंटल बियाणे विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये भात 12 हजार क्विंटल, सोयाबीन 12 हजार 200 क्विंटल, तूर 270 क्विंटल, मूग 500 क्विंटल, उडीद 1300 क्विंटल, खरीप ज्वारी 1612 क्विंटल, बाजरी 700 क्विंटल आणि मक्याचा 600 क्विंटल इतक्या बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा चालू वर्षात सुमारे अडीच हजार क्विंटलने बियाणांचा जादा पुरवठा करण्यात आला आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सहभागी शेतकर्यांसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.