Breaking News

वारकर्‍यांसाठी आवश्यक औषधे आणि साहित्य खरेदीसाठी 35 लाख रुपये


पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यंदाच्या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी आवश्यक औषधे आणि साहित्य खरेदीसाठी तयार करण्यात आलेल्या 35 लाख रुपये निधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या निधीच्या माध्यमातून औषध खरेदीसह ऍम्ब्युलन्स, आरोग्याबाबत जनजागृती, साहित्य वाटप आणि आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा प रिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. या वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी यंदा (2018-19) अरोग्य विभागाकडून 35 लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद केली आहे. या निधीला स्थायी स मितीने मान्यता दिली असून, जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकातून हा निधी देण्यात आला आहे.