Breaking News

आंध्र प्रदेशमध्ये आंब्याचा ट्रक उलटून 7 ठार

चित्तोर : आंध्र प्रदेशमधील चित्तोर जिल्ह्यात आंब्याची वाहतूक करणारा एक ट्रक उलटून झालेल्या अपघातामध्ये 7 जण ठार झाले आहेत. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर चित्तोरचे जिल्हाधिकारी पी.एस प्रद्युम्न यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.