Breaking News

जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी ईद उत्साहात साजरी

जामखेड / ता.प्रतिनिधी - जामखेडसह नान्नज, जवळा, खर्डा, अरणगाव, हलगाव, पिंपरखेड, मुसलमानवाडी, फक्राबाद, झिक्री, चोंडी, धनेगाव, सोनेगाव, घोडेगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला. यावेळी शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

ईदगाहवर अदा करण्यात आलेल्या नमाज ईदनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी विश्‍वशांती, बंधूप्रेमासाठी यावेळी महाराष्ट्रात पाऊस लांबल्याने ईदनिमित्त अल्लाहकडे भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली. 
यावेळी ईदगाह मैदान परीसरात शुभेच्छा देण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, डीगंबर चव्हाण, डॉ. भास्कर मोरे, लक्ष्मण ढेपे, शहाजी राळेभात, नासीर पठाण, अजहर काझी शेरखान पठाण, मैालाना खलील, मैालाना अहमद, फिरोज कुरेशी, अकबर शेख, बब्बु पठाण, फकीरभाई नय्युम सुभेदार, तसेच नान्नज येथे अमजद पठाण, जमील शेख, अल्लाउद्दीन शेख, बाबा शेख, युनूस पठाण, फारूक शेख, अहमद शेख, हाकीम शेख गणी पठाण, अमर चाऊस, महमद कुरेशी, अबुबकर आत्तार आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
नमाजनंतर सामूहिक दुआ पठण्यात आली. जगावर येणारी सर्व संकटे दूर करून अल्लाहने विश्‍वशांती स्थापन करावी. सर्व मानव जातीमध्ये परस्पर बंधूप्रेम वाढीस लागावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. नमाज संपताच सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनीही गळाभेट करून बालमित्रांना ईद मुबारक केले. 
रोजा, नमाज, तराविह नमाज, कुराण पठण करून पुण्य मिळविण्याचा महिना म्हणून रमजान महिना मानला जातो.ईदनिमित्त शहरातील प्रत्येक मशिदीमध्ये दिलेल्या वेळांप्रमाणे ईदची नमाज अदा केली गेली. नमाज पठणानंतर मुस्लिम धर्मियांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर मुस्लीम समाजबांधवांच्या घराघरांतून शीरखुर्म्याचे कार्यक्रम सुरू होते. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी शहरासह नान्नज, खर्डा, जवळा, हलगाव, पिंपरखेड, अरणगाव या गावांसह तालुक्यात रमजान ईद हा सण सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.