Breaking News

मोहम्मद साद याचा रमजानचा उपवास (रोजा) यशस्वीपणे संपन्न


उक्कलगाव (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील फारूक अब्दुल वहाब शेख यांचे चिरंजीव मोहम्मद साद (वय 7 ) या लहान बालकाने रमजान महिन्याचा उपास यशस्वीपणे पार पडला. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या उपास मे व जून या कडक उन्हाळ्यात सुरू झालेले आहे. यापुर्वी हे उपवास पावसाळ्यात, हिवाळ्यात होत असे मात्र चालू वर्षात अत्यंत कडक उन्हाळ्यात उपास सुरू झाल्याने उपसाकाची मोठी कसरत होत आहे. त्यामध्ये या लहान बालकानी उपवास ठेऊन सर्वांना आश्‍चर्यचकीत केले आहे. मोहम्मद साद याचे वडील फारूक शेख श्रीरामपूर एसटी डेपोत कंडक्टर आहे. हा उपास यशस्वी पार पडला म्हणून मोहम्मद साद याचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.