Breaking News

इग्लंड दौर्‍यासाठी रायडूऐवजी सुरेश रैनाची निवड

मुंबई- इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सुरेश रैनाची निवड करण्यात आली आहे. यो-यो फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या अंबाती रायडूऐवजी रैनाची संघात निवड करण्यात आलेली आहे. यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे संघाबाहेर होणारा रायडू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी मोहम्मद शमीला अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीतून बाहेर व्हावे लागले होते. बंगालच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे शुक्रवारी झालेल्या फिटनेस चाचणीत रायडू अपयशी ठरला होता. त्यानंतर निवड समितीने रैनाला संघात स्थान दिले आहे. सुरेश रैना आपला शेवटचा एकदिवसीय सामना 2015 साली खेळला होता. इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तीन टी-20, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे. या दौर्‍याला 3 जुलैपासून मँचेस्टर येथे टी-20 च्या सामन्याने सुरुवात होईल. तर पहिला एकदिवसीय सामना 12 जुलैला खेळवण्यात येणार आहे.


भारतीय एकदिवसीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्‍वर कुमार