Breaking News

शेवगाव पंचायत समिती कार्यालयात आहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

शेवगाव प्रतिनिधी दि 31 - शेवगाव पंचायत समिती कार्यालययामध्ये पंचायत समिती कर्मचार्‍यांकडून अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शेवगावचे गटविकास अधिकारी अशोक भवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक कोकाटे व पंचायत समिती मधील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेवगावचे गटविकास अधिकारी अशोक भवरी म्हणाले की, आज जे काही समाजात महिलांना मानाचे स्थान आहे ते आहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांनी गाजवलेल्या कर्तृत्वामुळे आहे . त्यामुळे महिला अधिकारी वर्गाने याची कायम जाणीव ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी बापू चव्हाण, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी हराळ मॅडम, लपाचे डमाळे इत्यादी कर्मचारीवृंद या कार्यक्रमाला हजर होते.