Breaking News

शिक्षण हे समाजपरिर्तनाचे माध्यम : कोकणे


संगमनेर प्रतिनिधी 
ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता असून तिला वाव देणे गरजेचे आहे. खेडोपाडी असलेल्या जि.प. शाळांमधून शिक्षकांनी अधिकाधिक गुणवत्ता जपत ज्ञानदान करावे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे. कारण शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे यांनी केले.

धांदरफळ बुद्रूक येथील जि. प. शाळेत पहिल्या दिवशी सभापती कोकणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होत्या. कोकणे म्हणाल्या,  माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा तालूका विकासाचे मॉडेल ठरला आहे. येथील शैक्षणिक संस्थांचा राज्यात लौकिक आहे. शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.