न्यायालयाच्या आदेशावरून माजी लष्करशाह मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई

पाकिस्तानी न्यायालयाच्या आदेशावरून त्या देशाचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पारपत्र (पासपोर्ट) स्थगित करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने त्यांना फरार जाहीर केले. आता अलीकडेच न्यायालयाने मुशर्रफ यांचे ओळखपत्र आणि पारपत्र स्थगित करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पाऊले उचलल्याचे समजते. पारपत्र स्थगित झाल्याने मुशर्रफ इतर कुठल्याच देशात जाऊ शकत नाहीत. याशिवाय, दुबईमधील त्यांचे वास्तव्यही अवैध ठरेल.आता त्यांना राजकीय आश्रय घेणे भाग पडेल किंवा पाकिस्तानात परतण्यासाठी विशेष कागदपत्रांची व्यवस्था करावी लागेल.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget