Breaking News

पदोन्नतीमध्ये आरक्षण अंमलबजावणीचे आदेश जारी

नवी दिल्ली : सरकारी नोकरदार अनुसूचित जाती-जमातीतील (एससी, एसटी) कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीत आरक्षण मिळण्याचा मार्ग आता खऱ्या अर्थी मोकळा झाला आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना तसेच राज्यांनाही न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.. सरकारी नोकरदार एससी-एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्यावरून अनेक वाद उत्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने विविध राज्यांतील उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या होत्या. त्या याचिकांवर उच्च न्यायालयांनी परस्पर विरोधी निकाल दिले होते. हा सर्व वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने सन २०१५ साली या मुद्द्यावर स्थगिती आदेश दिले होते.