Breaking News

हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, सात मुलींची सुटका


पुणे - वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या दिघी येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून सात मुलींची सुटका केली. ही कारवाई आळंदी-मोशी रोड डुडुळगाव येथील आमंत्रण ला ॅजिंग या हॉटेलवर करण्यात आली. विजय शिवले, वैजनाथ बाबर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजर वैजनाथ हा मुलींना पैशांचे आ मिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस हवालदार रमेश लोहकरे यांच्याक डून माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि दिघी पोलीस यांनी संयुक्तपणे आमंत्रण लॉजिंग या हॉटेलवर छापा मारला.