Breaking News

इस्लामी संस्कृतीत परिवाराला मोठे स्थान : आ. कोल्हे


कोपरगाव शहर प्रतिनिधी

ईश्वरप्राप्तीसाठी मुस्लिम बांधव रमजान सणानिमित्त महिनाभर कठीण उपवासाचे व्रत करतात. सर्वधर्मीय समभावाचा जातीय सलोखा राखून सर्वांबरोबर आपली प्रगती साधणे, हे महत्वाचे आहे. महंमद पैगंबरांनी पवित्र कुराण ग्रंथातून सर्वांनाच समाजात कसे वागावे, याची शिकवण दिली आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढून न्याय मिळवावा. आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण यांना इस्लामी संस्कृतीत मोठे स्थान आहे. शहरातील ईदगाह मैदानावर सार्वत्रिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर रमजान ईदनिमित्त आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमास माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासह उपनगराध्यक्ष विजय वाजे, मौलाना महंमद हाफिज, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, तहसिलदार किशोर कदम, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, माजी नगरसेवक करीम कुरेशी, हाजी सद्दाम सययद, अलताफ कुरेशी, फकिर महंमद पहिलवान, गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल, पराग संधान, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, जितेंद्र रणशूर, दिपक गायकवाड, स्वप्निल निखाडे, जनार्दन कदम, संजय पवार, वैभव गिरमे, दिपक जपे, सत्येन मुंदडा आदींसह आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी रविंद्र पाठक यांनी आभार मानले.