Breaking News

कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते कु. हर्षल खर्डे चा गौरव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डी आय सी  'अभिकल्प१८' या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयांमधील विद्यार्थीनी कु. हर्षल सुखलाल खर्डे या विद्यार्थीनीने  सादर केलेल्या ' नैसर्गिक स्वच्छता माध्यम ' या प्रकल्पास दुसरे पारीतोषिक मिळाले. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते कु. हर्षल सुखलाल खर्डे या विद्यार्थिनीचा पुणे येथे गौरवीण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.


      लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयांमध्ये  एम.एस.सी केमेस्ट्री या वर्गात शिकत असलेल्या  कु. हर्षल खर्डे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डी आय सी  'अभिकल्प १८' या स्पर्धेत सहभाग घेऊन ' नैसर्गिक स्वच्छता माध्यम ' हा प्रकल्प सादर केला होता . तिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय थोरात, डॉ. नितीन साळी, डॉ. अनिल वाबळे . डॉ. वैशाली मुरादे यांचे सह शिक्षकांचे मार्गसर्शन लाभले.
     कु. हर्षल खर्डे हिच्या यशाबद्दल  राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर,उपप्राचार्य डॉ.रामचंद्र  रसाळ, प्रा. सौ. छाया गलांडे तसेच  शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.