Breaking News

उघड्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍या चायनीज कॉर्नरवर पोलिसांची धड़क कारवाई


डोंबिवली - उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करून नागरिकाच्या आरोग्यास धोका निर्माण करणार्‍या चायनीज कॉर्नरवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे. कल्याण डोंबिवली येथील मुख्य रस्त्यावर चौकामध्ये खाद्य पदार्थाच्या हातगाड्या बिनदिक्कतपणे चालविल्या जात आहेत. याबाबत अनेकदा दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. हे हातगाडी चालक अत्यंत निष्काळजीपने तसेच नित्कृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ विकण्याचे काम बिनदिक्कत करतात. पोलिसांनी अशा निष्काळजीपणे उघड्यावर खाद्यपदार्थ विकून नागरिकाच्या आरोग्याशी खेळणार्‍या चायनीज, वडापाव गाड्या विरोधात धड़क कारवाई सुरु केली आहे. कल्याण पश्‍चिमकेडिल बेतूरकरपाडा परिसरातील प्राईड चायनीज येथे मानवी जीवितास धोका निर्माण होईल तसेच ज्वालाग्रही शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करत खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवून मानवी जीवितास आरोग्यास अपायकारक होईल अशा पद्धतीने विनापरवानगी विक्री करत असल्याचे आढळून आले. यामुळे बाजारपेठ पोलिसांनी चायनीजचे मालक अकिल बिश्‍वास विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केली असली तरी महापालिका प्रशासनाक डून मात्र अशा खाद्य पदार्थांच्या गाड्यावर कारवाई करिता हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे.