Breaking News

इंग्लंडसाठी खेळणार वेस्ट इंडीजचा खेळाडू


नवी दिल्ली
वेस्ट इंडीजचा खेळाडू जोफ्रा आर्चर हा २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघातून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तसेच जोफ्रा आर्चरला इंग्लंडसंघात घेण्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळ ब्रिटनच्या नागरिकत्वाबाबत असलेले नियम शिथील करणार आहे. वेस्ट इंडीजच्या अंडर-१९ संघाचे जोफ्रा आर्चरनेप्रतिनिधीत्व केले आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०१८ मध्ये आपल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सलग सहा ते सात वर्षे ब्रिटनमध्ये राहणे इंग्लंड संघाकडून खेळण्यास पात्र होण्यासाठी बंधनकारक असते. पण इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या समितीने जोफ्रा आर्चरलाआपल्या संघात खेळवण्यासाठी या नियमात बदल केले आहेत. जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या अकराव्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १० सामन्यात१५ गडी बाद केले होते.