Breaking News

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात टीटीपीचा म्होरक्या ठार


नवी दिल्ली : अमेरिकेने पुन्हा एकदा लादेनवरील कारवाईसारखीच कारवाई केली आहे. लादेनला ठार केल्याप्रमाणे, आता तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) म्होरक्या मुल्ला फजलुल्ला याला ड्रोन हल्ल्यात ठार केलं. अमेरिकेने अफगाणिस्तान पूर्वेकडील कुनार प्रांतात दहशतवादी मुल्ला फजलुल्लाचा खात्मा केला. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुनार प्रांतात 13 जूनपासून सुरक्षा रक्षकांची मोहिम सुरु होती. यावेळी मुल्ला फजलुल्ला हा जवानांच्या निशाण्यावर होता. तहरीक-ए-तालिबान ही संघटना अलकायदाशी संलग्न आहे. या संघटनेनेच फैजद शहजाद या अतिरेक्मयाला टाईम्स स्क्वेअर हल्ल्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं.