Breaking News

खत खरेदीसाठीही आता आधार कार्ड बंधनकारक

मुंबई - आधार कार्ड अनेक योजना व विविध बाबींसाठी आजवर सक्तीचे करण्यात आलेले आहे. आता आधार कार्ड असल्याशिवाय शेतकर्‍यांना खतांची खरेदी करता येणार नाही. राज्य सरकारकडून खत कंपन्यांना देण्यात येणार्‍या अनुदानाचा योग्य वापर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकर्‍यांना मिळालेल्या खतावरच अनुदान देता येईल, यासाठी आधार क्रमांक हा सक्तीचा करण्यात आलेला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खत खरेदीचा वेग वाढणार आहे. दुक ानामध्ये खताची खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे पॉस मशिनमध्ये त्याची नोंद करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला कच्च्या पावत्या करून त्यानंतर पक्क्या पावत्या केल्या जात होत्या. याच पावत्या गृहीत धरून शेतकर्‍यांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटले जाते. 

युरिया खतांवर सरकारकडून 75 टक्के अनुदान कंपन्याना दिले जाते. महाराष्ट्रात पाच हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट कंपन्यांना दिले जात असल्यामुळे या अनुदानाचा फायदा कंपन्यानाच मिळत होता. या वर्षी पॉस मशिनमधून शेतकर्‍याने आधार नंबर आणि बोटांचे ठसे टाकल्यानंतरच खत विकत मिळणार आहे. राज्यात जवळपास 25 हजार दुकांनामध्ये पॉस मशीन लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये 23 हजार पॉस मशिन लावण्यात आलेल्या आहेत. पॉस मशिनच्या पावतीशिवाय राज्याच्या कोणत्याही भागात खताची विक्री करू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यातील 36 कंपन्यांनी पा ॅसद्वारे विक्रीत सहभाग घेतलेला आहे. 


खतांचा गैरव्यवहार टाळण्यासाठी 
राज्यातील ग्रामीण भागात पॉस मशिनमुळे अडचण निर्माण होते. पॉस मशिनमुळे तत्काळ खते मिळत नाहीत. मात्र पक्की पावती मिळते. शेतकर्‍यांना पक्की पावती मिळाल्यामुळे खतांच्या अनुदानात गैरव्यवहार होणार नाही आणि योग्य त्या लोकांनाच फायदा होईल यासाठी आधार क्रमांकाची सक्ती शेतकर्‍यांसाठी फायद्याची ठरणार असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.