Breaking News

शेतकर्‍यांचे आंदोलन प्रसिद्धीसाठी कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची मुक्ताफळे

नवी दिल्ली - शेती प्रश्‍नावर आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी 1 जूनपासून देशभरात आंदोलन पुकारले असतानाच हे प्रश्‍न समजून न घेताच बरळण्याचे काम देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनोखे काम करावेच लागते, तेच काम शेतकरी करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य सिंग यांनी केले. शेतकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांची पुर्तता क रण्यासाठी 10 दिवसीय किसान अवकाश आंदोलन पुकारले आहे. यावर बोलताना केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले, की देशात 12 ते 14 कोटी शेतकरी आहेत. कोणत्याही शेतकरी संघटनेत 1 हजार ते 2 हजार शेतकरी असतात. त्यांना माध्यमांमध्ये दिसण्यासाठी अनोखे कामे करावीच लागतात. सिंग यांच्या या असंवेदनशील वक्तव्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.